कावली येथे महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नवचैतन्य गणेश मंडळ व पुण्य लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान व मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष अंतर्गत श्री गणेश आरोग्याचा महाआरोग्य तपासणी शिबिर नुकतीच गणेश मंडळ येथे संपन्न झाले.

 या आरोग्य शिबिरामध्ये अनेक तपासण्या करण्यात आल्या यावेळी या तपासण्यामध्ये रक्तदाब रक्तातील साखर वजन व मधुमेह यासारख्या चाचण्या या शिबिरामध्ये घेण्यात आल्या या शिबिरामध्ये गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते हे विशेष आकर्षण या शिबिराचे ठरले.

 या शिबिरामध्ये सर्वश्री डॉ. नारनवरे वैद्यकीय अधिकारी कावली,शिंदे साहेब आरोग्य सहाय्यक, कु. डोंगरे मॅडम आरोग्य सेविका, राजेश धूपम क्षेत्र कर्मचारी, आशा पर्यवेक्षिका मनीषा भुसारी, आशा वर्कर सुकेशनी टाले, कविता सोनवणे, धीरज ढंगारे, सर्व कर्मचाऱ्यांनी या रुग्णांची योग्य प्रकारे तपासणी केली तपासणी करत असताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना आपल्या त्यांच्या आरोग्य विषयी माहिती दिली.

 या शिबिरामध्ये गावातीलच रुग्णांनी नव्हे तर अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

 नवचैतन्य गणेश मंडळ व आशा वर्कर यांनी संपूर्ण गावांमध्ये नागरिकांना शिबिराची माहिती दिली त्यामुळे या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते.

 सदर शिबिरामध्ये ज्या तपासण्या करण्यात आल्या त्या तपासण्या करत असताना बाहेर ठिकाणी अनेक पैसे मोजावे लागतात परंतु यामुळे यामध्ये विनामूल्य झाले त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

 हे महाआरोग्य शिबिर सर्वश्री नवचैतन्य गणेश मंडळ व आरोग्य विभागाने अथक परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad