कावली येथे एक दिवस एक तास एक साथ श्रमदान अभियान संपन्न

0
30
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

‘स्वच्छ भारत अभियान ग्रामीण’ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित स्वच्छता हि सेवा २०२५ एक दिवस एक तास एक साथ श्रमदान हा उपक्रम पंचायत समिती धामणगाव रेल्वे अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय कावली च्या माध्यमातून गावामध्ये राबविण्यात आला.

स्वच्छता ही सेवा २०२५ कावली गावामध्ये या अभियानाची सुरुवात नवयुवक नवदुर्गा मंडळ, गांधी चौक या ठिकाणाहून करण्यात आली.सर्व प्रथम महात्मा गांधी, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून रितसर सुरुवात करण्यात आली.अभियानाची पार्श्वभूमी व माहिती विशाल सुटे समूह समन्वयक पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांनी जमलेल्या समुदायाला समजावून सांगितली. अभियानामध्ये स्वच्छता रॅली, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पथनाट्या द्वारे स्वच्छतेचा संदेश गावातील लोकांना देण्यात आला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणुन हाती खराटा घेऊन समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा तसेच “चल चल भाई करे सफाई कुडा कचरा साफ करे” या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या उक्ती प्रमाणे स्वच्छता अभियान कावली गावामध्ये राबविण्यात आले. गावातील ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी, नवयुवक नवदुर्गा बहुउद्देशीय क्रीडा मंडळ, नवचैतन्य गणेश मंडळ , सखी ग्राम संघ, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, भजनी मंडळ महिला-पुरुष,श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, व्यापारी मंडळ, कृषी सेवा केंद्र चालक, तसेच ग्रामपंचायत कावली येथील सर्व नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचा शेवट हा नवयुवक दुर्गा मंडळ गांधी चौक येथे करण्यात आला.यावेळी मानवी साखळीच्या माध्यमातुन स्वच्छतेचे संदेश देण्यात आले व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. व स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुद्धा स्वच्छतेची शपथ शालेय विद्यार्थ्यांना निलेश मोहकार यांनी दिली.

कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत अधिकारी सौ.अश्विनी पोलादे यांनी मानले व या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच सौ.चंदाताई जांभळे , उपसरपंच श्री संदीप इंगळे , ग्रामपंचायत अधिकारी सौ.अश्विनी पोलादे, श्री गजेंद्र रोडे, श्री संजय इंगळे, श्री महेंद्र जाधव ,निलेश मोहकार,रोशन वाघे,प्रमेश ठाकरे,सुनिल ठाकरे,शुभम हरणे,निखिल मानकर यांनी अथक परिश्रम केले.

veer nayak

Google Ad