धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
दिनांक 26 जुलै रोजी से. फ. ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या कार्यक्रमाला धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. रमेशचंद्रजी चांडक, प्रमुख उपस्थिती सहसचिव डॉ.असितजी पसारी उपस्थित होते. तसेच विशेष आमंत्रित अतिथी म्हणून धामणगावच्या मातीत जन्म घेतलेल्या भारतीय सेनेत रुजू होऊन ज्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष देश सेवेकरिता, या भारतमाते करिता अर्पण केले अशी माननीय माजी सैनिक सुधीरजी नगराळे, रामदासजी हाडे, हर्षदजी भेंडे, पुरुषोत्तमजी भिल, दिनेशजी ठाकरे यांची उपस्थिती होती.. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे सर्व मान्यवरांसोबत ते सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी करून दिला.. उपस्थित सर्व माजी सैनिक यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष एड. रमेशचंद्रजी चांडक प्रमुख उपस्थिती डॉ.असितजी पसारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमाचे मनोगतपर भाषण माजी सैनिक सुधीरजी नगराळे यांनी मार्गदर्शन करताना कारगिल युद्धाच्या वेळेस ची वास्तविकता विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच विद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्सनी एन.सी.सी. चे सि.टी.ओ.व विद्यालयाचे शिक्षक प्रवीण पनपालिया यांच्या मार्गदर्शनात शहीद जवानांना मानवंदना दिली. कारगिल युद्धात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देणे हेतू विद्यालयातील विद्यार्थी मधुर मुंधडा ,पार्थ बुटले , मनस्वी खडसे व विद्यालयातील गानचमू यांनी विद्यालयातील शिक्षक नारायण सुरंदसे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशा आवाजात देशभक्तीवर आधारित गाणी प्रस्तुत केली आणि सर्वांची मने जिंकून घेतले.
विद्यालयातील कलाशिक्षक अजय जिरापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवस वर आधारित चित्ररेखाटन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात एड. रमेशचंद्रजी चांडक यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कार्यक्रमाला उपस्थित माजी सैनिक यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक कैलाश चौधर यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.प्रदीप मानकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रा. प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.