दर्यापूर (तालुका प्रतिनिधी)आज दिनांक १६/३/२४ रोजी फिर्यादी सुलताना परवीन जमील खान वय 28 वर्षे राहणार मुल्लापुरा बाभळी यांचे पती जमील खान अफसर खान वय ३९ वर्ष रा.बाभळी यांच्या घराशेजारी राहणारे युनूस खान अजीज खान यांच्यासोबत फिर्यादीच्या पतीचा घरगुती वाद असून आज दोन वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती जमील खान हे जयस्तंभ चौक ए डी सी बँके जवळ मोबाईल वर बोलत असताना आरोपी शोएबखान खलील खान, जहीर खान खलील खान व युनूस खान अजीज खान हे तेथे आले व फिर्यादी यांच्या पतीकडे रागाने पाहिले यावरून त्यांच्या मध्ये भांडण झाले व त्या तिघांनी जमील खान (दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आसिफ पैलवान यांचा चुलत भाऊ) जमील खान
यांना लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली,त्यात ते गंभीर जखमी झाले असून सिटीस्कॅन करण्याकरिता अमरावती येथे रेफर करण्यात आले त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दर्यापूर येथे दाखल करण्यात आले होते पतीला मारहाण झाल्याची माहिती फिर्यादी ला फोन वरुन मिळाली असता त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठले असता त्यांना पती जमील खान अफसर खान हे रक्तबंबाळ अवस्थेत दिसुन आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन दर्यापूर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध कलम ३०७,५०४,५०६,३४ आयपीसी नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.