जुना धामणगाव ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत   पाणीपुरवठा पाईपलाईन मध्ये लिकेज, देवाण-घेवान झाल्याची नागरिकांमध्ये चर्चेला उधाण,?

0
73
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे/सध्या दाभाडा धामणगाव येथे सोलर प्लांट वर ठेकेदाराच्या मार्फत काम चालू आहे हे काम करत असताना ठेकेदाराकडून जुन्या धामणगाव ला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन काम करणाऱ्या मजुराकडून खोदकाम करीत असताना फुटली, पाईपलाईन फुटल्याची माहिती जुना धामणगाव ग्रामपंचायत ला माहित पडतात येथील काही नेतेमंडळी व कर्मचारी लगेच घटनास्थळी पोहोचले व फुटलेल्या पाईपलाईन करिता ठेकेदाराकडून पैशाची मागणी करीत असल्याची खमंग चर्चा येथील नागरिकांमध्ये आहे यावेळी ग्रामपंचायत मधील काही सदस्यांनी ठेकेदाराला पैशाच्या मागणी सोबतच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी सुद्धा दिल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे, यावेळी सरते शेवटी वीस हजार रुपये मध्ये सदर प्रकरण सेटलमेंटच्या माध्यमातून दाबण्यात आल्याची माहिती काही नागरिकाकडून बोलली जात आहे,

खरंच जुन्या धामणगाव येथील काही कर्मचारी व नेते मंडळींनी याबाबत सेटलमेंट केली आहे का, अशी जोरदार चर्चा सध्या जुन्या धामणगाव परिसरात रंगत असल्याची माहिती नागरिकांमध्ये होत आहे,

असे प्रकरण झाले असल्यास येथील कर्मचाऱ्यांवर पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी ही नागरिकांच्या माध्यमातून बोलले जात आहे

veer nayak

Google Ad