धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व संस्थांचा संयुक्त प्रजासत्ताक समारोह थाटामाटात साजरा

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे:-

स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सर्व संस्थांचा संयुक्त प्रजासत्ताक समारोह मोठ्या उत्साहात व हर्शोल्हासात साजरा करण्यात आला.धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एड. श्री. रमेशचंद्रजी चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विविध संस्थांच्या एन.सी.सी, एम.सी.सी स्काऊट गाईड, बुलबुल पथक यांनी मानवंदना देऊन अध्यक्षांना सलामी दिली. समारोहाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांनी थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून वंदन केले.

कार्यक्रमाला व्यवस्थापनेचे मा.एड.श्री. आशिषजी राठी सचिव, धामणगाव एज्युकेशन सोसायटी, मा. श्री. प्रदीपकुमारजी लुणावत, माझी उपाध्यक्ष, मा. डॉ. श्री. प्रकाशजी राठी, माजी सचिव, माननीय डॉ. श्री. अशोक जी सकलेचा, माजी सहसचिव व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

भारताच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे नाट्य नृत्य व देशभक्तीपर नृत्यांच्या माध्यमातून विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी समाजाला शांतता व सौहार्दाचा हदयस्पर्शी संदेश दिला. त्याचप्रमाणे सामूहिक कवायती मधून सुदृढतेचे धडे दिले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सतीश राऊत, श्री. चंद्रशेखर वडगिरे व कु. दीक्षा तिवारी यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव ऍड. श्री. आशिषजी राठी यांनी केले.

या समारोहाच्या यशस्वीते करिता प्राचार्य श्री. अमित भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमाच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पथक परिश्रम घेतले. तसेच सर्व संस्थांचे संस्थाप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयुक्त समारंभामध्ये मोलाचे सहकार्य केले.

veer nayak

Google Ad