जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 3 (जिमाका ): जवाहर नवोदय विद्यालय,अमरावती मध्ये शैक्षाणिक सत्र 2026-27 करिता इयत्ता सहावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs वर निःशुल्क अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2025 पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असावा. तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त शाळेतून सत्र 2025 -26 मध्ये वर्ग पाचवीत अध्ययनरत असावा. अर्ज करताना विद्यार्थ्यांने स्वतःच्या आधारकार्ड क्रमांकाने अर्ज करावा. ज्या विद्यार्थ्यांची शाळा नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात येत असेल त्यांनी शहरी विभागातून अर्ज करावेत. विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान असावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे .
*****

veer nayak

Google Ad