तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने जिकडेतिकडे ओले ओले असल्याकारणाने दुचाकी स्लिप होण्याचे प्रकरणात वाढ झाली आहे. या पावसामुळे रहदारी कमी झाली असून अशातच दुचाकी स्लिप होऊन अपघात झालेल्या पिता-पुत्रासाठी देवदूत बनवून धावून आले.
ट्राफिक पोलीस व युवक .बायपास रोडवर फतेपुर येथील रहिवासी विजय दुर्वे हा त्याच्या मुलासोबत गावाकडे जात असताना दुचाकी क्रमांक MH 32 X 66 42 ही पावसामुळे स्लिप झाली .त्यामुळे दोघे पिता-पुत्र खाली पडले .पडल्यामुळे विजय दुर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागला व तो जखमी झाला .रोडवरच बराच वेळ कोणी नसल्याकारणाने जखमी अवस्थेत तो पडून राहिला व तीन वर्षाचा मुलगा त्या पित्याकडे पहात रडत बसला होता .लगेच माहिती मिळताच देवा जवंजाळ हा घटनास्थळी धावून गेला व घटनेची माहिती मिळताच ट्राफिक हवालदार रवी पाखरे, मजहर खान ,112 चालक अभिजीत परिमल हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले .क्षणाचाही विलंब न करता त्यांनी 112 वाहनातच जखमी युवकाला टाकून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणले. तत्काळ जखमी युवकावर उपचार सुरू करण्यात आला . मोबाईल वरून जखमीच्या नातेवाईकांना सदर घडलेल्या अपघाताची माहिती देण्यात आली. त्या जखमी युवकासाठी जणू देवदूतच धावून आले ट्राफिक हवालदार रवी पाखरे ,मजहर खान, 112 चालक अभिजीत परिमल व देवा जवंजाळ यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या जखमी युवकाला वेळेवर उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. तेव्हा या देवदूत बनून आलेल्या ट्राफिक हवालदार व युवकाचे कौतुक करावे तेवढे कमीच.