जेल के ताले तुट गये, केजरीवाल छूट गये….।अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजुर होताच चांदूर रेल्वेत जल्लोष. “आप” कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजुर होताच चांदूर रेल्वे शहरात जुना मोटार स्टँड येथे स्थानिक आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आप नेते नितीन गवळी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर ७ मे रोजी सुनावणी पार पडली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने शुक्रवारी यासंदर्भात निकाल दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. निवडणुकीकरीता जामीन मिळाल्याने आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असुन चांदूर रेल्वे शहरात सुध्दा जल्लोष करण्यात आली. यावेळी जेल के ताले तुट गये, केजरीवाल छूट गये यांसह विविध घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी आप नेते नितीन गवळी, मेहमूद हुसेन, राजाभाऊ भैसे, मंगेश डाफ, चरण जोल्हे, विनोद लहाने, निलेश होले, सै. अजमतभाई, संजय बाबर, विशाल चव्हाण, प्रदीप मेश्राम, पंकज गुडधे, प्रफुल डोके, शाम भेंडकर, शितल बेराड, भूषण नाचवणकर, सुरज पटले यांसह अनेक कार्यकर्ते, मित्र पक्षाचे कार्यकर्ते, शहरवासी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad