महर्षी वाल्मिकी म्हणतात ‘सदगुणांचा सर्वोच्च बिंदु म्हणजे प्रभु श्रीराम’…
प्रभु श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी, गुणवान पुत्र, राजधर्मचारी, होते आणि हे सगळे गुण त्यांच्या अंगी असुन देखील या सर्व गोष्टींच्या त्यांना क्वचित देखील अहंकार नव्हता. संस्कृतिरक्षक श्रीराम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्यांच्यातील गुण आपल्याला कसे अंगिकारता येतील या साठी श्रीरामाची शिकवण आज सर्वांनी जाणली पाहिजे..
आज दिनांक – 17 एप्रिल श्री “रामनवमी” निमित्ताने धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक – चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे..