चांदूर रेल्वे
जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने चांदूरवाडी येथे आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेची जंगी सुरूवात चांदूरवाडी परिसरातील पटांगणावर झाली आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा व पत्नी प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते बैलजोडी पुजन करून या शंकरपटाच्या दुसर्या दिवसाची सुरुवात झाली या दिवशी अनेक नामवंत बैलजोड्यांनी आपला सहभाग नोंदविला असून हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव आपल्या जोड्यांसह या स्पर्धेसाठी चांदूर शहरात तुफान गर्दी झाली आहे.
डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या पुढाकाराने चांदूर रेल्वे शहरात प्रती वर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात या वर्षी आगळावेगळा प्रयोग म्हणजेच भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन जय हिंद मंडळाने केले या शंकरपटाचे दुसऱ्या दिवशी प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी विधीवत शंकरपटाचे मैदान तसेच बैलजोडीचे पुजन करत दुसर्या दिवसांच्या स्पर्धेची सुरुवात केली यावेळी मंचावर तालुक्यातील पत्रकार ,व्यापारी,माजी नगरसेवक,जय हिंद मंडळाचे उपाध्यक्ष दीपक डाहाने उपस्थित होते.
या शंकरपटाच्या निमित्ताने जय हिंद मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ मान्यवर,अधिकारी, पोलिस कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, पत्रकार, डॉक्टर, वकिल अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला आज चांदूर रेल्वे येथील जेष्ठ पत्रकार युसुफ खान,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुड्डू शर्मा ,बंडू आठवले,अभिजित तिवारी,सुधिर तायडे,मंगेश बोबडे,मनोज गवई,बाळासाहेब सोरगीकर,धिरज नेवारे,राहुल देशमुख,राजेश शिवनकर, पियुष ठोंबरे,नांदगाव खडेश्वर पत्रकार प्रदीप जोशी,अमरावती इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संजय शेंडे, प्रणय निर्वाण,अमर घटारे, स्वप्नील उमप,छगन जाधव,सुरज दाहाट,कॅमेरा मॅन,व्यापारी अंकुर खाकोले, माजी उपाध्यक्ष प्रसन्ना पाटील,विजय मिसाळ,सचिन जयस्वाल,शेतकरी यांचा पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह,दुपट्टा देऊन निलेश विश्वकर्मा यांनी सत्कार केला सुंदर अश्या शंकरपटाचे आयोजन करण्यात मंगळाचे पंकज वानखडे, प्रशांत बोबडे, केशव केने, श्रीकांत भोयर, प्रवीण मोहोड, मिथीलेश विश्वकर्मा, अमोल भैसे, अजय चौधरी, पवन म्हस्के, विवेक आसोले, राजीक शेख, अनंत कडूकार, बुरान बोहरा, प्रवीण खेरकर, सूनील सोनोने,राजिक पठाण सह मंडळाचे पदाधिकारी तसेच नियोजन समिती सदस्यांची हे परिश्रम घेत आहे.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पत्रकार गौरव इंगळे हे करीत असून शेतकरी बाधवाचे मनोबल उंचावण्यासाठी डॉ निलेश विश्वकर्मा सतत मंचावरून मार्गदर्शन करीत आहे अश्या या भव्यदिव्य शंकरपटात डॉ निलेश विश्वकर्मा यांनी ही बैलजोडी हाकली त्याचा हा उत्साह पाहून उपस्थित युवकांनी शेतकरी नेता अशी उपमा दिली.हा शंकरपट पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव तुफान गर्दी करीत आहे .