अमरावती शहरातील महाविद्यालयीन मुले, काही मध्यमवर्गीय व्यापारी, तरुण तसेच अल्पवयीन पिढी ही मोठ्या प्रमाणावर गांजा, MD ड्रग्स चे सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत समाजात जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. मा. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया अमरावती शहर यांच्या संकल्पनेतून अंमलीपदार्थ विरोधी जनजागृती व कठोर कारवाईसाठी यापुढे अमरावती शहरांमध्ये *Operation Wipe Out ही मोहीम राबविण्यात येणार आहे. एमडी, गांजा स्वतःजवळ बाळगणे, वाहतूक करणे, विक्री करणे किंवा त्याचे सेवन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमरावती शहर पोलीस कटिबध्द आहेत.
अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, जर आपल्या आजूबाजूस/ परिसरात एखादी व्यक्ती गांजा,ड्रग्स स्वतःजवळ बाळगून असेल खरेदी विक्री करीत असेल किंवा त्याचे सेवन करीत असेल तर अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण (9923814242 ) यांना संपर्क साधून माहिती द्यावी.आपले नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल आणि संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल… चांगली बातमी देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल.
अरविंद चावरिया
पोलीस आयुक्त, अमरावती शहर