विद्यार्थ्यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंदांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे.. डॉ.नितीन खर्चे यांचे प्रतिपादन…

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा स्वर्गीय नंदलाल लोया कन्या विद्यालय व श्रीराम कनिष्ठ महिला महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

 याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रमोद मुंधडा तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक विलास कडू, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसतेचे विदर्भ प्रांत आयाम प्रमुख सुभाष पुसदकर,कामगार कल्याण केंद्राचे केंद्र प्रमुख गजानन सोनटक्के, प्राचार्य सौ. अर्चना राऊत, कमल छांगाणी, मुख्याध्यापिका नंदा नांदुरकर उपस्थित होते होते . 

आपल्या व्याख्यानातून डॉ. नितीन खर्चे म्हणाले विद्यार्थ्यांनी माँ जिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार अंगिकारने आवश्यक असून ज्ञान,चारीत्र,एकता, राष्ट्रीयता,संस्कार ,संस्कृती तसेच भारतीय परंपरा जिजाऊ व स्वामीजींच्या कार्यातून दिसते .त्यांच्या कार्यातून राष्ट्र कार्य करण्याची दिशा व दशा मिळते 

प्रत्येक विद्यार्थांचे लक्ष शिक्षणासोबत राष्ट्र बलवान व प्रगतीपथावर कसे जाईल याकडे सुद्धा असावे अमेरिकेतील शिकागो परीषदेतिल संवाद खर्चे यांनी अतिशय मार्मिक शब्दांत सांगितला.माँ साहेबांनी व स्वामीजींनी हिंदू धर्माच्या रक्षणाकरिता मोलाचे कार्य केले

प्रत्येक स्त्रीला माता मानणारे स्वामीजींचे विचार त्यांनी विशद केले भाऊ बहिणीचं नातं काय असत हे पहिल्यांदाच स्वामीजींच्या अमेरिकेतील भाषणातून जगाला कळलं असल्याचे ते म्हणाले जिजाऊ आईसाहेब राज घराण्यातील असून सुद्धा त्यांनी घोडेस्वारीपासून तर युद्ध बाबतच्या सर्व शिक्षा ग्रहण केल्या होत्या त्यामुळे स्वामीजींचे व जिजाऊ साहेबांचे गुण प्रत्येकाने अंगीकारावे 

सुभाष पुसदकर यांनी सुद्धा जिजाऊ आणि स्वामीजींबद्दल आपले प्रखर विचार व्यक्त केलेत. अध्यक्षीय भाषणात प्रमोद मुंधडा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वामीजी व जिजाऊंच्या पदचिन्हावरच आपली वाटचाल केल्यास जीवन नक्कीच सर्वगुणसंपन्न व राष्ट्रभक्ती निर्माण होईल

प्रास्ताविक गजानन सोनटक्के यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून सोनटक्के यांनी शासनाच्या विविध लाभार्थी योजना विद्यार्थ्यांना सांगितल्या. परिचय कमल छांगाणी यांनी तर संचालन संजय जाधव व आभार सौ.वृंदा जोशी यांनी मानलेत

veer nayak

Google Ad