धामणगांव रेल्वे ग्रामीण रुग्णालय व फार्मसी कॉलेज तर्फे अवयदान रॅली तसेच एचआयव्ही जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. माणुसकी हा मूळ धर्म आहे पीडीत्यांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद फुलविणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे .अवयदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद फुलवणे शक्य होते. तसेच मृत्यूच्या दाराशी असणाऱ्या व्यक्तीला अवयदानामुळे नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे अवयदान सर्वात मोठे पुण्य कर्म आहे असा संदेश यावेळी देण्यात आला. ग्रामीण रुग्णालय येथेल वैद्यकीय अधीक्षक कांचन रहांगडे ,तालुका ग्रामीण अधिकारी हर्षल शिरसागर व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते बाबा ठाकूर यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅलीमध्ये घोषणा देत नागरिकांना अवयदानाबद्दल संदेश दिला व अवयदान विषयी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात आली.