महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय अमरावती अंतर्गत कामगार कल्याण केंद्र धामणगाव रेल्वे येथे गटस्तरीय व्यक्तिमत्व विकास शिबिर बाल संस्कार शिबिर दिनांक 20 /5 /2025 ते 30 /5/ 2025 पर्यंत . उपकल्याण आयुक्त मुंबई व नागपूर/ अकोला विभाग प्रमुख माननीय श्री नंदलाल राठोड साहेब आणि कामगार कल्याण अधिकारी गट अमरावती सौ प्रतिभाताई भाकरे मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिबिराचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर प्रियंका बोरगे मॅडम,सामाजीक न्याय विभाग विभाग अंतर्गत माननीय सरोजाताई आवारे ,सौ मीराताई बडवाई मॅडम माननीय श्री ओझा काका माननीय श्री गौरव वानखडे माननीय श्री खोलकुठे सर माननीय श्रीपाल राऊत श्री निलेश वानखडे माननीय सो नीलिमाताई बोकडे सौ रुपाली ताई ठोकर, कुमारी.धनश्री ठोकर , श्री सागर ठाकरे श्री सचिन कुरेकर , या मान्यवरांनी दररोज मुलांना बाल संस्कार व्यक्तिमत्व विकास शिबिर मार्फत मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिनेश राव बोबडे मुख्य व्यवस्थापक शाखा नवदुर्गा सहकारी पतसंस्था धामणगाव रेल्वे. प्रमुख पाहुणे माननीय श्री कमल किशोर छागणी सर अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तालुका दैनिक हिंदुस्थान दैनिक तरुण भारत तालुका प्रतिनिधी माननीय श्री सचिन कुरेकर सर विकास डेव्हलपमेंट ऑफिसर एलआयसी धामणगाव रेल्वे
सामाजीक न्याय विभाग अंतर्गत सरोजाताई आवारे मॅडम ,डॉक्टर प्रियंका ताई बोरंगे. माननीय श्री किशोर बागवान अधिकारी नगर परिषद धामणगाव रेल्वे
यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बाल संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रतीक्षा प्रजापती यांनी केले व प्रास्ताविक विनोद इंगळे केंद्र संचालक यांनी केले सर्व मान्यवरांनी बाल संस्कार शिबिराच्या मनोगत व्यक्त करताना सर्व मुलांना मार्गदर्शन केले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ स्वाती धामंडे यांनी केले सदर कार्यक्रमाला सौ माधुरी गवळी कुमारी अनिता गजभिये नरेंद्र नांदुरकर प्रतीक्षा प्रजापति मेघा नांदुरकर दुरकर सरोज कुथे राधिका भिवरेकर ची हर्षवर्धन वरकड आणि कुमारी आर्या वरखड यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न केला.