इंडियन मेडिकल असोशिएशनचा पुढाकारातून धामणगावात आज 18 फेब्रुवारीला हृदयरोग निदान तपासणी शिबीर

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्व. आलोक पोळ व स्व. सौरभ दशसहस्त्र यांच्या स्मृती प्रित्यर्थ, शैक्षणिक व जागरूकता अभियाना अंतर्गत इंडियन मेडिकल असोशिएशन शाखा, धामणगांव रेल्वे द्वारा धामणगांव मेडीकल असोशिएशन च्या सहयोगाने २५ ते ५० वयोगटातील नागरिकांसाठी हृदयरोग निदान व चर्चा सत्राचे आयोजन आज १८ फेब्रुवारी रविवारला माहेश्वरी भवन येथे केलें असून स्थानिक डॉक्टराकडे नोंदणी झालेल्या केवळ शंभर रुग्णाची येथे तपासणी करण्यात येणार आहे.

२५ ते ५० वयातील नागरिकांमध्ये हृदयरोग झपाट्याने वाढत आहे त्यावर लवकर निदान व कारण व उपचार याबाबत मार्गदर्शन शंका समाधान प्रश्नोत्तराचे आयोजन सामाजिक जबाबदारी समजुन आयएमए ने केले आहे. यासाठी नामांकित व नागपुर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. राम घोडेस्वार, डॉ. योगेश कोलमकर, डॉ. कमल भुतडा, डॉ. चेतन राठी पुणे येथील डॉ. अभिषेक सकलेचा यांचे बहुमोल व तज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे. माहेश्वरी भवन, येथे रविवार, १८ फेब्रुवारी रोजी चर्चासत्र दुपारी १.३० वाजता चर्चा सत्राला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयएमए चे अध्यक्ष डॉ अशोक भय्या, उपाध्यक्ष डॉ अशोक सकलेचा, सहसचिव डॉ असित पसारी डॉ प्रकाश राठी कोषाध्यक्ष डॉ मनीष अप्ततुकर डॉ शोभा राठी, डॉ भरत पालीवाल डॉ महेश साबळे, डॉ. आकाश येंडे डॉ सागर राऊत डॉ, अमित गुल्हाने डॉ सव्वालाखे तसेच धामणगाव मेडिकल असोसिएशन केले आहे.

veer nayak

Google Ad