मंगरूळ दस्तगीर येथे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मंगरूळ दस्तगीर (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) 

आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी मंगरूळ दस्तगीर येथे दि. विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि., नागपूर (अमरावती शाखा) यांच्या वतीने, मंगरूळ दस्तगीर सेवा सहकारी सोसायटी मर्या. (र.नं. १०८५) येथे केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत NAFED मार्फत सोयाबीन खरेदी शुभारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापदादा अडसड उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद रवीभाऊ भुतडा यांनी भूषविले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोयाबीन खरेदीची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, “किमान आधारभूत किंमतीअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असून दलालमुक्त, पारदर्शक व्यवहार सुनिश्चित होईल.” अध्यक्ष रवीभाऊ भुतडा यांनी सेवा सहकारी सोसायटीमार्फत खरेदी प्रक्रिया सुरळीत, वेळेत व शेतकरीहितास अनुकूल राहील, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रबी हंगामात आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.

veer nayak

Google Ad