आर्वी, प्रतिनिधी / पंकज गोडबोले
आर्वी : आपल्या आर्वी शहरा मध्ये प्रथमच डवरे संगीत कराओके क्लब,स्टुडीओ क्लब आर्वीचे उद्घाटन या उद्घाटना प्रसंगी मा. डॉ. दिवाकर ठोंबरे व राजीव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते दि. २४/१०/२०२५ राेजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तसेच आर्वीकरांसाठी एक विशेष ऑफर यामध्ये आपण घेऊन आलेलो आहाे त्यामध्ये प्रत्येक संगीत कलाकारांना दर महिन्याला संगीत गायनाचा आस्वाद घेता येईल व या क्लबच्या माध्यमातून नवीन गायकांना व इतर लहान मुलांना व इतर महिला पुरुषांना एक स्टेज उपलब्ध करून दिला जानार आहे.


तसेच या एस एस के क्लब तर्फे प्रत्येक वेळेस मोहम्मद रफी, लतादीदी या सर्वांचे कार्यक्रम आपण करत असतो तसेच प्रथमच उद्घाटन झालेल्या डवरे संगीत कराओके क्लब, मध्ये ०१/११/२०२५ पासून सर्वांना गायन सराव करण्याकरता संगीत करा स्टुडिओ मध्ये डवरे लेडीज कलेक्शन सेकंड फ्लोअर गांधी चौक, आर्वी येथे सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून आर्वी मध्ये कुठे पण कुठलाही कार्यक्रम असल्यास कोणाला सराव करायचा असल्यास ते या स्टुडिओ मध्ये येऊन गायन सराव करू शकता तर एकदा या संगीत कराओके स्टुडिओ ला अवश्य भेट द्यावे असे क्लबचे संस्थापक मनाेज डवरे यांनी सांगितले. तसेच या क्लबच्या उद्घाटना वेळी राजेंद्रशिंग दीक्षित, नंदू इरावर, डॉ. अशोक गोल्हर, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश अमृतकर, सलीम शेख, नितीन गवळी, निलेश दुधे, रवि बुधवानी, संदीप केला, अजय लाठीवाला, गणेश काळबांडे, राजू कुळमेथी, प्रकाश खांडेकर, प्रशांत देशपांडे, जितेंद्र येळवटकर, रोशन चौधरी,सतीश अर्जुन, शुभम पाचोडे, शुभम गोल्हर, सौ मनीषा शर्मा, पदमा भेदे, अश्विनी गोल्हर, साधना गेडाम, अर्चना वसू, स्वेता दळवी, सुनीता गोल्हर, अनिता होले, पुष्पा पखाले, रिया शर्मा,अक्षदा डवरे, इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.













