शिवाजी प्राथमिक शाळा येथे डिजिटल क्लासरूम व कम्प्युटर लॅबचे उद्घाटन

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : आज दिनांक एक ऑक्टोबर २०२५ रोजी पी एम श्री शिवाजी प्राथमिक शाळा येथे डिजिटल क्लासरूम व कॉम्प्युटर लॅब चा उद्घाटन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. डॉ. किरणजी सुकलवाड साहेब ,मुख्याधिकारी नगरपरिषद आर्वी. तसेच प्रमुख अतिथी मा. श्री गणेश जी खडके साहेब प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग नगर परिषद आर्वी, उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मा. साखरे सर ,सेवानिवृत्त शिक्षक गांधी विद्यालय नगरपरिषद आर्वी. तसेच मा. सुनीलजी संकलेच्या, माजी विद्यार्थी शिवाजी प्राथमिक शाळा नगरपरिषद आर्वी .शा. व्य. समिती अध्यक्ष सौ. हर्षा कानेरकर ,मा. अमितजी पालीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थित मा. डॉ. किरणजी सुकलवाड साहेब, मुख्याधिकारी नगरपरिषद आर्वी यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

.या कार्यक्रमा दरम्यान छोटासा सत्कार समारंभ घेण्यात आला. यावेळी आपले शिक्षण विभाग प्रमुख मा. श्री खडके साहेब .प्रशासनाधिकारी अभ्यासू , जिज्ञासू , व सकारात्मक दूरदृष्टी असलेले ,प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी . यांनी आपले शैक्षणिक विचार व्यक्त केले.आजच्या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात झालेली क्रांती व तंत्रज्ञान व त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्यनावर होणारा परिणाम या बाबत मार्गदर्शन केले . आम्हा शिक्षकांकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या.त्यानंतर

मातृत्व दातृत्व आणि कर्तुत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेल व्यक्तीमत्त्व म्हणजे आपले मुख्याधिकारी साहेब. साहेबांनी आपल्या भाषणातून मोबाईलचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी पालकांना मार्गदर्शन केले तसेच बदलत्या युगात तंत्रज्ञानाची गरज यावरही आपली विचार मांडले.त्यांच्या विचारातून शिक्षणाविषयी ची तळमळ आस्था दिसून येत होती त्यांनतर

 शाळेच्या काही आवश्यक असलेल्या भौतिक गरजा यावर चर्चा केली. साहेबांचं मार्गदर्शन प्रेरणादायी , परिणामकारक व मोलाचं होतं .शेवटी विद्यार्थ्यांशी हितगुज केली. आम्हा सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौधरी मॅडम यांनी केले तर संचालन श्री. महेश मते सरांनी केले . आभार श्री . राहुल कोरडे सर यांनी मानले .कार्यक्रमाचे यशस्वीते करीता सौ. पूजा धरम ठोक सहाय्यक अध्यापिका व शाळेतील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

veer nayak

Google Ad