वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय लहू शक्तीच्या सक्रिय कार्यकर्त्यांचे मेहनतीने भाजपाचे चारही उमेदवार विजयी करण्यात सिंहाचा वाटा! …राजेश अहिव

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी :-

             दिनांक 23 जानेवारीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मा .सुमितदादा वानखडे हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याने स्थानिक शासकीय विश्राम गृह येथे राष्ट्रीय लहू शक्ती महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस , माजी संचालक वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन राजेश अहीव यांनी कार्यकर्त्यांसह यांचे अभिनंदन केले 

        त्याप्रसंगी श्री.राजेश अहीव यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितले की,वर्धा जिल्ह्यातील चारही भाजपा चे उमेदवार श्री.सुमित दादा वानखेडे आर्वी,समीर कुनावार,हिंगणघाट,पंकज भोयर वर्धा, व राजेश बकाने देवळी या मतदार संघातील उमेदारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मा.लोकनेते स्व.मधुकरराव कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षंपासून मातंग समाजाला भाजपा ला जोडून ठेवल्याने व भाजपच उपेक्षित हिंदू दलितांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य करेल असा विश्वास दिल्याने मा. परिमल दादा कांबळे यांनी विदर्भातील सर्व राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व ताकतीने पक्षाचे काम करण्याचे आदेश दिल्याने वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात ,विशेषतः ज्या मूर्तिजापूर मतदार संघात परिमल दादा ला अपेक्षित उमेदवारी मागितली होती ती नाकारल्याने सुद्धा समाजाने मोठ मन करून भाजपाचे रणींग आमदार श्री. पिंपळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केले यात विदर्भातील सर्व राष्ट्रीय लहू शक्ती महाराष्ट्र प्रदेश च्या व सकल मातंग समाजाने प्रचंड मेहनत करून राज्यात भाजपा ची सत्ता स्थापन होण्या पर्यंत संख्या बळ दिलं या बद्दल अभिनंदन व आभार मानण्यात आले, यात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष विलास डोंगरे,उपाध्यक्ष सुधाकर वाघमारे, कमलेश लोखंडे,धीरज शिंदे,रमेश हनवते, वानखेडे सर, प्रवीण वानखेडे,सकल मातंग समाजाचे सर्व बांधव,आष्टी तालुका प्रमुख सुनील संतापे,कारंजा प्रमुख,नानाभाऊ जाधव,कैलास कावळे,प्रियंका शेळके,ज्येष्ठ पदाधिकारी भिमरावजी हिवराळे, दिगंबर मुंगळे,महिला उपाध्यक्षा सुमनताई बावणे,संगीता वानखेडे,अशोकराव डोंगरे,उत्तमराव चव्हाण, शोभाताई जोंधळे ,शामरावजी इंगोले, पुंडलिक पवार,देवळी,अमोल खंडारे, फाकिराजी खडसे,गणेश मुंगले , हिंगणघाट,चेतना कांबळे,प्रवीण डोंगरे,सुरेश चव्हाण, व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले, या प्रसंगी विदर्भातील सर्व आमदार,मुख्यमंत्री यांनी उपेक्षित हिंदू दलितांना सामाजिक न्याय द्यावा ही अपेक्षा करण्यात आली

veer nayak

Google Ad