चांदुर रेल्वे) प्रतिनिधी :-सद्या धामणगाव रेल्वे विधनसभा क्षेत्रांमध्ये येत्या २० नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा तडफदार उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची धडक मोहीम सुरु असताना ,गावा गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद बघून निलेश विश्वकर्मा च्या नैतृत्वावर विश्वास ठेवत भुगांव येथील काँग्रेस चे खंदे कार्यकर्ते तथा उपसरपंच पदी विराजमान असलेले रवींद मोकळे यांनी वंचित आघाडीच्या अनेक कार्यक्रत्तांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे जाहीर स्वागत करण्यात आले. मोकळे यांच्या पक्षप्रवेसाच्या छोटेखानी कार्यक्रमाला मिनेश शिंदे,चंदुभाऊ उके, रोशन बनसोड, विनोद चांडकापुरे ,दीपक आडे तसेच पाथरगाव येथील भास्कर चंडकापुरे व समस्त वंचित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.