धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर परिसरात स्थानिक नायगाव शेत शिवारात अगदी गावाजवळ असलेल्या उमेश शिसोदे व सुधीर भगत यांच्या शेतात कालवड आणि बकरीची शिकार काल रात्री एका वन्य प्राण्याने केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान काही काळापूर्वी या परिसरात एका नरभक्षी वाघाने धुमाकूळ घालुन दोन लोकांचा जीव घेतल्यामुळे मंगळदस्तगीर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केली आहे.
वृत्त लिहेस्तोवर वन विभागाने घटनास्थळाची पाहणी केली नव्हती
गेल्या अनेक दिवसांपासून दिघी माले मंगरूळ दस्तगीर नायगाव परिसरात वाघ असल्याची चर्चा होती कित्येक शेतकऱ्यांना मजुरांना शालेय विद्यार्थ्यांना वाघाचे दर्शन झाल्याचे वृत्त आढळून आले होते तर जेमतेम दीड महिन्यापूर्वी मंगरूळ दस्तगीर शिवारात बिबट्यांचे बछडे आढळून आल्यानंतर ते वनविभागाने पुन्हा जंगलाच्या स्वाधीन केले होते या घटनांमुळे गेल्या चार ते पाच वर्षापासून संपूर्ण परिसरात वन्य प्राण्यांच्या भीतीच्या सावटाखाली आहे कुठलीही मोठी जीवितहानी होण्याची वाट न बघता वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा असा आक्रोश परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात वनविभाग आता काय कारवाई करते याकडेच संपूर्ण परिसराचे लक्ष लागलेले आहे
—//////————
बाईट:सूरज शिसोदे माजी उपसरपंच नायगाव