नगरपरिषद चे कुठल्याही प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता, सर्रासपणे मनमानी पद्धतीने एम एस ई बी प्रशासनाच्या, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या खांबांवर मनमानी पद्धतीने मोठ मोठे खोके लावण्याचे कार्य सर्रासपणे सुरू आहे, आणि या खोक्यांमुळे कोणाचा अपघात, अथवा करंट लागून जीव गेला तर, एम एस ई बी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा आरोप युवक काँग्रेस च्या माध्यमातून करण्यात आला.
तसेच या खोक्यांमुळे कोणाचीही जीवित हानी झाल्यास आपल्या माध्यमातून कुठली आर्थिक मदत केल्या जाईल याचा सुद्धा आपण खुलासा करावा ही मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली, तसेच हे नियमाबाह्य लागणारे खोके त्वरित थांबवण्यात यावे कारण यास शहरातील वीज ग्राहकांचा असा विरोध आहे आणि याच विरोधाला लक्षात घेऊन युवक काँग्रेस ने हा मुद्दा हाताशी घेतला.
जर एम एस ई बी प्रशासनाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात याबाबत कुठलेही उत्तर देत नसेल आणि मनमानी करत असेल तर याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्या जाईल व या सर्व जबाबदार एम एस ई बी प्रशासन स्वतः राहील असे आंदोलकांनी सांगितले व हा सगळा खटाटोप मीटर बाहेर काढण्याचे कारण हे येणाऱ्या काळात स्मार्ट मीटर लावण्याकरिता आहे जेणेकरून लोकांना मोबाईल प्रमाणे रिचार्ज करून वीज वापरावी लागेल आणि हे सगळे लोकांना परवडणारे राहील असा मुख्य आरोप युवक काँग्रेसने या ठिकाणी एमएसईबी प्रशासनावर केला. यावेळी तेथे उपस्थित युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष शिंदे, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, मयूर डूबे, निवृत्ती वैद्य, विवेक बोरकर, विशाल राय, विशाल डूबे, विनय मोहकार, संदेश कुचेरिया, निखिल रोंघे, मुकेश अर्जुने, अविनाश पाचभई, सतीश रघोर्ते,गुरू शाहू, अर्जुन यादव, नंदू कनोज, धन्नू यादव, प्रकाश यादव, दिलीप क्षीरसागर, करण यादव, सौरव पांडे, राजा यादव, प्रवीण नमुळते, सुनील यादव, इत्यादी युवा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.