ग्रामीण भागात रस्त्यांची झाली चाळणी; नागरिक वैतागले. पहिल्याच पावसात वाहून गेला धामनगाव – तिवरा रस्ता

0
235
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, धामणगाव -तिवरा या रस्त्याची तर अक्षरशः चाळणी झाली आहे सदर रस्त्याचे अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम झाल्यामुळे कमी कालावधीतच रस्ता उखडून जात आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वर्षभरात रस्ता खराब

राज्य शासनाच्या बजेट मधून गतवर्षी हा रस्ता मंजूर झाला कार्यारंभ आदेश झाल्यानंतरही कंत्राटदाराने उशिरापर्यंत सदर रस्त्याचे काम सुरू केले नाही त्यानंतर संथ गतीने रस्त्याचे काम करण्यात आले मात्र वर्षभरात हा रस्ता खराब झाला

कोणी केले काम

मागील अनेक वर्षापासून तालुक्यात वादग्रस्त ठरलेल्या एका यवतमाळ येथील कंत्राटदाराने सदर रस्त्याचे काम केले आहे रामगाव- वडगाव- धामणगाव या रस्त्याचे काम या कंत्राटदाराने केले होते तो रस्ता ही काही दिवसात उखडला होता या रस्त्याचे कामही या कंत्रादारांकडून केले असल्याचे सांगण्यात आले 

चार कोटी चे काम

धामणगाव- जळगाव आर्वी तीवरा असा सहा किलोमीटर रस्त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे सदर काम चांगल्या पद्धती व्हावे म्हणून शासनाने तब्बल चार कोटी रुपये या रस्त्याला दिले आहेत मात्र सध्या तरी या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे

पुढे काय

सदर रस्त्यावरील सील कोट व कार्पेटचे कामे पूर्ण व्हायची आहे ही कामे पावसाळ्यामुळे थांबली होती सदर कामे पुढील काही दिवसात पूर्ण करण्यात येईल

 नरेंद्र वानखडे

 उपविभागीय अभियंता

 सा बा उपविभाग धामणगाव रेल्वे

veer nayak

Google Ad