नांदगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची सर्रास लुट कवडी मोल भावाने व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी

0
1
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

कमी दराने सोयाबीन खरेदी केल्याने शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नांदगाव खंडेश्वर /
शेतकऱ्याच्या सोयाबीनला आज व्यापाऱ्यांनी कवडीमोल भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन परिणामी अमरावती यवतमाळ रोडवरील वाहतूक रोखून धरली असता काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
आज शेतमाल लिलावाचे वेळी नांदगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा लिलाव सुरू झाला तेव्हा व्यापाऱ्यांनी २५०० रुपये प्रती क्विंटल पासून बोली बोलायला सुरुवात करून खरेदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला याची बाजर समिती प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्याने बाजार समिती मधील खरेदी विक्रीचा व्यवहार शेतकऱ्यांनीचं नारेबाजी करून बंद पाडला आज बाजार समितीत प्रति क्विंटल ३१८० रुपये २५१० रुपये एवढ्या कमी भावाने सोयाबीन खरेदी करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनि अमरावती यवतमाळ रोडवरील वाहतूक रोखून चक्काजाम केला तेव्हा काही वेळेसाठी या रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत काढली त्यामुळे रास्ता रोको आंदोलन थांबवून बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात तब्बल पाच तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले लेखी आश्वासना शिवाय उठणार नाही असा पवित्रा घेत बाजार समितीच्या आवारात राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी आक्रमक होत बाजार समिती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले संबंधित व्यापारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत अन्यथा बाजार समिती सोडणार नाही असा इशारा दिल्याने अखेर बाजार समितीचे सचिव मोहोड यांनी आज खरेदी केलेल्या मालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार रद्द केला व आज झालेल्या कमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीन प्रकरणाची उद्या संपूर्ण चौकशी करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले या वेळी या आंदोलनात शिवसेनेचे प्रकाश मारोटकर माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर काँग्रेसचे अमोल धवसे सुनील शिरभाते फिरोज खान देवेंद्र सव्वालाखे श्रीकृष्ण सोळंके मधुकर कोठाळे राजेश जाधव हितेश शेळके सर्वेश खेडकर भास्कर काळे सचिन रोकडे दिलीप महल्ले अंकुश कणसे अमोल जवळकर सुमदेव चव्हाण नरेंद्र दहातोंडे अतुल भडके राहुल गुल्हाने यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

आज नांदगाव बाजार समितीमध्ये विक्री करता आलेल्या सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा असंतोष वाढून आला तेव्हा सदरचा शेतमालाचा लिलाव रद्द करण्यात येऊन उद्या दिनांक २२/१०/ २०२४ रोजी अधिकारी व पंचकमिटी यांच्यासमोर हे प्रकरण ठेवण्यात येईल शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार सदरहू व्यपाऱ्यावर योग्य ती चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच कारवाई होईपर्यंत बाजार समिती पूर्णता बंद राहील असे लेखी पत्र बाजार समितीचे सचिव यांनी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना दिले.

veer nayak

Google Ad