खोलापूर – शिवसेना संस्थापक तथा हिंदूहृदयसम्राट यांनी निर्माण केलेल्या शिवसेना पक्षाच्या वटवृक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या विचाराने खोलापुर या गावात 19 जून ला शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आपल्या गावातील जी व्यक्ती आपल्या घरासमोर 19 जून 2024 ला झाड लावून ते झाडाचे 19 जून 2025 पर्यंत संगोपन करणार त्याचा ग्रामपंचायत चा 3 वर्षाचा आरोग्य कर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ अलका निलेश पारडे भरणार असे त्यांनी सांगितले आहे. सद्यस्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व येणाऱ्या काळात उन्हाची तीव्रता कमी होईल या विचाराने हा संकल्प सौ अलका निलेश पारडे यांनी केला आहे.सौ अलका निलेश पारडे यांच्या संकल्पनेला गावातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.