घरकुल लाभार्थ्यांना अडचणी आल्यास आता भेटा थेट गटविकास अधिकारी यांना कुण्याही संबंधित विभागाला एक रुपया लाच देण्याची आवश्यकता नाही

0
39
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

प्रतिनिधी-गौरव टोळे

दर्यापूर अंजनगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून विनोद खेडकर यांच्याकडे पाहिले जाते दर्यापूर आणि अंजनगाव या दोन पंचायत समितीचा कारभार त्यांच्या एकावरच असून ते पूर्ण वेळ कुठेच थांबू शकत नाही दिवस कमी आणि सोंगे जास्त अशी त्यांची अवस्था झाली आहे शासनाच्या क्षणोक्षणाला नियम अटी बदलत असतात निरनिराळे प्रशिक्षण शिबिरे व मार्गदर्शन शिबिरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चर्चा करणे ही कामे सुद्धा कार्यालयीन वेळेत करावी लागतात याचबरोबर कार्यालयाच्या हत्यारीमध्ये नसलेले कामे सुद्धा त्यांना करावी लागतात हे तितकेच खरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष जबाबदारी सुद्धा गटविकास अधिकारी यांच्यावर सोपवली आहे त्यात शासकीय कार्यालयात कर्मचारी वृंद हे अल्प प्रमाणात आहेत या कारणामुळे समस्यांचा ढिगारा पंचायत समिती कार्यालयात साचला गेला आहे अशा अवस्थेत असताना सुद्धा घरकुल लाभार्थी यांना काही कारणास्तव पंचायत समितीची दारे तुडवावी लागतात प्रसंगी त्यांचा सुद्धा वेळ खर्ची केल्या जातो परंतु पंचायत समितीमधील एखादा अपवाद कर्मचारी वगळता कामकाज हे आदर्शरीत्या पूर्ण केले जाते असे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी प्रसार माध्यमांशी व्यक्त केले विशेषता घरकुल लाभार्थ्यांना कुठलीही समस्या जाणवल्यास थेट गटविकास अधिकारी यांच्या दालनात जाऊन समस्येचे निराकरण होईल त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याला एक रुपया सुद्धा देऊ नये असे आढळल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे सुद्धा गटविकास अधिकारी यांनी प्रसार माध्यमावर व्यक्त केले

veer nayak

Google Ad