धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा यांचे निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान या थीम द्वारे दत्तक ग्राम मंगरूळ दस्तगीर येथे दिनांक 18/1/2026 ते 25/1/2026 दरम्यान संपन्न झाले

विशेष शिबिरामध्ये शिबिरार्थींना श्रमाचे मूल्य कळावे व गावकऱ्यांच्या सहकार्याने विधायक कार्य करण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये पाकोळे विद्यालय, मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय दवाखाना व मंगरूळ बस स्टँड परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी गावातून बॅनर, हॅन्ड होर्डिंग व पोस्टरद्वारे जलसंवर्धन एड्स निर्मूलन व मतदार जनजागृती संदर्भात रॅली काढून जनजागृती केली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारे निर्मित कमी खर्चाचे विविध शेती उपयुक्त तंत्रज्ञानाचा यावेळी प्रचार व प्रसार करण्यात आला.
या सर्व उपक्रमांना महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नंदूशेठ चव्हाण, मंगरूळ दस्तगीर चे सरपंच सतीश हजारे, उपसरपंच गिरीश सुरोसे, स्थानिक व्यवस्थापन पदाधिकारी महादेव शिवणकर, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, मंगरूळ दस्तगीर ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. शरद नायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.पवन शिवणकर, श्री सुहास आप्तुरकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.
















