तळेगाव दशसहस्र (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती)
तळेगाव दशसहस्र येथील ऐतिहासिक हिंद केसरी जंगी शंकर पटाचे यंदा १५१ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरे करण्यात आले. या मानाच्या व ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेल्या शंकर पटाचे उद्घाटन आमदार प्रतापदादा अडसड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार प्रतापदादा अडसड म्हणाले की, “१५१ वर्षांची परंपरा जपणारा हा शंकर पट ग्रामीण संस्कृतीचा गौरव असून पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.” या शंकर पटामधून ग्रामीण जीवनशैली, कृषी परंपरा आणि बैलजोडींच्या शौर्याचे प्रभावी दर्शन घडले.


कृषक सुधार मंडळ, तळेगाव दशसहस्र यांच्या वतीने आयोजित या भव्य शंकर पट कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. अर्चना अडसड-रोठे (आक्का), नगराध्यक्ष धामणगाव रेल्वे, श्री शिवाजीराव देशमुख, श्री मोहनभाऊ इंगळे (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, धामणगाव रेल्वे), श्री नरेंद्रभाऊ रामावत (माजी पंचायत समिती सदस्य), भाजपा श्री प्रणयभाऊ राजनकर, भाजपा तळेगाव दशसहस्र अध्यक्ष श्री गजूभाऊ शेंद्रे, श्री अशोकभाऊ धनजोडे, श्री रविभाऊ भुतडा (माजी पंचायत समिती सदस्य), श्री श्यामभाऊ घाटे, श्री कृष्णाभाऊ मारोडकर (भाजपा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष), भारतीताई चूटे (ग्रामपंचायत सदस्य), संगीताताई गवळी (ग्रामपंचायत सदस्य), श्री रामप्रसादजी चन्नव, श्री पप्पूभाऊ भालेराव (गटनेता, चांदूर रेल्वे), श्री दिलीपरावजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



या ऐतिहासिक शंकर पट स्पर्धेला शेतकरी बांधव, गावकरी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. परंपरा, शौर्य आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम असलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असे चित्र पाहायला मिळाले.













