धामणगाव रेल्वे:-
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचलित द्वारा स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये “हिरोशीमा दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी मॅडम आणि सर्व शिक्षकगण उपस्थित होते. हिरोशिमा दिवसानिमित्त शाळेत विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता नववी च्या विद्यार्थिनी चंचल मानकानी आणि अभंगा लंगरे यांनी हिरोशीमा दिवसाबद्दल गोष्टीच्या माध्यमातून माहिती दिली.
इयत्ता सहाविच्या विद्यार्थिनींनी हिरोशीमा दिवसावर नृत्य शिक्षक सचिन उईके यांच्या मार्गद्शनाखाली “भारतीय एकता” या विषयावर आधारित सुंदर नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले .तसेच वर्ग पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांनी या दिवसाचे औचित्य साधून सुंदर, सुंदर क्रेन बनविले . शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती धर्माधिकारी आणि ऑर्गेनाईजेशन कमिटी सदस्य दिलीप खोब्रागडे आणि सुभाष बोस तसेच एलो हाऊस सदस्य स्नेहा राजपूत ,सचिन उईके,पूजा भैसे, स्नेहल राऊत, दीप्ती चौबे, समीक्षा अय्यर आणि मुस्कान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाला यशस्वी करण्यात आले.