हरवलेले मोबाईल दत्तापूर पोलिसांनी मूळ मालकांना केले परत

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे

पोलीस स्टेशन दत्तापूर हद्दीमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर 2024 मध्ये काही नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते. हरवलेले मोबाईल चा शोध लावून आज दिनांक 14 1 2025 रोजी मूळ मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल दत्तापूर पोलिसांकडून परत करण्यात आले. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड ,पोलीस उपनिरीक्षक मानकर ,तसेच पीएसआय सोनाली राठोड पीएसआय विकास राठोड यांच्या हस्ते रवींद्र भोसले ,शिवकुमार पांडे ,ईश्वर ठाकरे ,सुमित जाट, जगदीश दुबे यांचे हरवलेले मोबाईल त्यांना परत करण्यात आले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप तिरपुडे ,वाहतूक जमादार रवी पाखरे, पवन हजारे, सागर कदम ,अरुण पवार ,नवनाथ खेडकर ,महाजन, मनोज धोटे, अतुल पाटील, भाऊराव कामडी ,मजहर खान ,अमोल सानप ,दीपक पंधरे, झटाले, हरिहर वैद्य व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते .मोबाईल मिळालेल्या मूळ मालकांनी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

veer nayak

Google Ad