शिबिरात ३५ नवोदित तबला वादकांनी सहभाग घेतला होता. यात सर्व तबला वादकांनी सतत 8 तास सामूहिक तबला वादन केले. या शिबिराची संकल्पना क्लासेसचे संचालक श्री. अश्विनजी काचरे गुरूजी यांची होती. याप्रसंगी नवोदित तबला वादकांनी रियाज कसा करावा याबाबतीत श्री. काचरे गुरुजींनी मार्गदर्शन केले.
येणारी नवीन पिढी ही सोशल मीडिया सारख्या व्यसनाला बळी पडताना दिसून येते मात्र या अमूल्य वेळेत एखादी उत्कृष्ट कला अवगत केली जाऊ शकते असे प्रतिपादन श्री. काचरे गुरूजी यांनी केले. शिबिर उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला तुळजाभवानी मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. मानकर सर आणि सहसचिव श्री. ठाकरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षीच्या तबला परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.