भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधीलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे.त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात ज्ञानयोगी,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी व बहुआयामी विद्वान यांचे नाव सर्वात वर आहे.
दिनांक – 14 एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळा निमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून कोटी कोटी शुभेच्छा दिल्या आहेत