जगाला संस्कार संस्कृति आचार विचार एकता तसेच ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भारताच्या श्रद्धेवर आचार विचार संस्कृतीवर आघात करण्याचे षडयंत्र विविध मार्गाने होत आहे.

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,
जगाला संस्कार संस्कृति आचार विचार एकता तसेच ज्ञानाचा संदेश देणाऱ्या भारताच्या श्रद्धेवर आचार विचार संस्कृतीवर आघात करण्याचे षडयंत्र विविध मार्गाने होत आहे. हा विषय चिंतेचा नक्कीच आहे परंतु घाबरण्याचे कारण नाही आपल्या सर्वांना आपला इतिहास आपली संस्कृति रुजवावी लागेल कारण आम्ही पुत्र अमृताचे असे प्रतिपादन संस्कार भारतीचे अ.भा.मंत्री आशुतोष अडोणी यांनी येथे व्यक्त केले.


ते सत्कार्य प्रसारक मंडळ तर्फे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या जयंती व स्व.गणपतराव दादा पोळ स्मृति प्रित्यर्थ प्रथम व्याख्यानात बोलत होते
सेवा स्मृती भवनच्या पटांगणात आयोजित व्याख्यान प्रसंगी व्यासपीठावर रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक व सत्कार्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विपिनजी काकडे उपाध्यक्ष विनायक धुमाळ उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत प्रमोद मुंदडा व संस्कार भारतीचे सदस्य प्रशांत बदनोरे यांनी केले आपल्या शंभर मिनिटाच्या प्रखर,अभ्यासात्मक आणि रोखठोक व्याख्यानातून अडोणी म्हणाले की, आमचा संघर्षमय इतिहास नक्कीच आहे परंतु पराभूत होण्याचा इतिहास आमचा नाही आमच्यातील काही गद्दार निर्माण होतात तेव्हा आपल्या देशावर संस्कृति वर नक्कीच आघात होतो आपल्या सर्वांना राष्ट्राला पुनर्जीवन करण्याचे बहुमोल कार्य करावयाचे आहे आमच्या पराक्रमाची साक्ष इतिहास देतोच त्याच इतिहासाच्या आधारावर आणि आपल्या राष्ट्र भक्त सामान्य माणसांच्या भरोशावर आपला देश पुन्हा परम वैभवशाली होईल यात तीळ मात्र शंका नाही भारताला छत्रपती शिवाजी शंभूराजे स्वामी विवेकानंद सारख्या योद्धा व संत ऋषिमुनींचे आशीर्वाद प्राप्त आहे नुकतेच विश्व प्रसिद्ध संपन्न झालेल्या महाकुंभ बाबत बोलताना ते म्हणाले की संस्कार संस्कृति आणि एकतेचे प्रतीक म्हणून आपल्या देशातील 50% च्या वर लोकांनी पवित्र गंगेमध्ये स्नान केले विदेशातील शेकडो नागरिक आपल्या पवित्र रंगीत न्याहले हा एक विश्व रेकॉर्ड झालेला आहे गंगा यमुना सरस्वती आपल्या आस्तेचे उच्च स्थान आहे आपल्या राष्ट्राला इतिहासात वळण देणारा सामान्य माणूसच आहे त्यामुळे देशाचे भविष्य सामान्य माणूसच घडवतो असे ते म्हणाले हजारो वर्षाच्या संघर्षातून टिकलेल्या आपल्या राष्ट्राला पोखरण्याचे प्रयत्न सुरू आहे परंतु घाबरण्याचे कारण नाही आपल्या देश, देव आणि धर्माला राष्ट्रभक्त सामान्य माणसांनी टिकवून ठेवले आहे आणि पुढेही ठेवेल सामान्य माणसाची राष्ट्रभक्ती या राष्ट्राची प्रेरणाशक्ती आहे आम्ही हजारो आक्रमण झेललेत परंतु आजही ताठ मानेने उभे आहोत आणि हा विजयपथ चालूच राहणार आहे जगात अनेक देश आहेत परंतु भारताचा इतिहास काही वेगळाच आहे आपल्या राष्ट्रात स्वतः करिता नव्हे तर राष्ट्राकरिता जगणारी सामान्य माणसे आहेत अडोनी म्हणाले की 1690 ते 1707 पर्यंत मुघलांच्या लढाईत थोरले आणि धाकटे दोन्ही हुतात्मा झाले परंतु सामान्य माणसाच्या भरोशावर पुन्हा राष्ट्र उभे झाले आणि औरंग्याला ठार केले त्यामुळे पुन्हा विजयपथाचा इतिहास लिहिला गेला अशा आपल्या पुत्र अमृताचे असलेल्या राष्ट्रात जेव्हा तीन वर्षापासून तर वृद्धेपर्यंत अत्याचाराच्या घटना होतात तेव्हा मन विचलित होतोच अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले की, असे होऊ नये कारण आपले राष्ट्र आणि आपण “आम्ही पुत्र अमृताचे”….. या व्याख्यानाचे प्रास्ताविक व परिचय सत्कार्य प्रसारक मंडळाचे कमल छांगाणी संचालन सौ.राधा भूषण धुर्वे आभार सत्कार्य प्रसारक मंडळाचे सचिव गोपाल भैया यांनी मानलेत

veer nayak

Google Ad