अमरावती, दि. 16 : चिखलदरा तालुक्यातील हतरु व चुरणी या गावात साथरोगामुळे अचानक 24 रुग्णांना स्थानिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. रुग्णांवर तातडीने औषधोपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरील वैद्यकीय पथकही त्याठिकाणी पाठविण्यात आले होते. पथक व स्थानिक रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित रुग्णांवर प्रथमोपचार केलेत. या घटनेची पालकमंत्र्यांनी दखल घेऊन चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला गुरुवारी (ता. 15 ऑगस्ट) भेट दिली. याप्रसंगी वैद्यकीय सोयी-सुविधांचा व रुग्णांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा घेऊन साथरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.
पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या चिखलदारा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक पंकज