(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचलित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय, पिंपळखुटा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे श्री संत गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी दिनांक २०/१२/२०२४ रोजी साजरी करण्यात आली. यावेळी विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक बोंद्रे, प्रा पवन शिवणकर,प्रा. निकिता राऊत, प्रा कल्याणी जाधव, श्री प्रमोद नागपुरे, प्रा कुणाल राऊत उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व श्री संत गाडगे बाबा यांचे फोटोचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. यानंतर प्रा दीपक बोंद्रे यांनी गाडगे महाराज यांचे विचारांची समाजाला गरज असून समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी व स्वच्छतेला महत्त्व द्यावे, सर्वांनी शिक्षण घ्यावे, याबाबत संत गाडगेबाबांनी कीर्तनाचे माध्यमातून मांडलेल्या प्रभावी विचारांबाबत उपस्थित त्यांना माहिती प्रदान केली. प्रत्येक विद्यार्थ्याने गाडगे महाराज यांचे चरित्र वाचून या पुण्यतिथीचे औचित्य साधून नियमितपणे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल शेलोकार यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी वैष्णवी गोंडसे हिने केले. यानंतर संत बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय पिंपळखुटा येथे स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता मोहीम राबवली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री नंदू शेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख ,प्राचार्य सौ. वृषाली देशमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, श्रीराम डोळस ,श्री सुहास आप्तूरकर,श्री सागर शेंडे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांचे अमूल्य सहकार्य लाभले.