धामणगाव रेल्वे
नुकताच दहावीच्या सि बी एस ई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे ज्यात स्थानिक स्कुल ऑफ स्कॉलर्स च्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादित करून सम्पूर्ण तालुक्यात शाळेचे नावलौकिक केले आहे. या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक केशव मुंधडा याने ९२.२% गुण प्राप्त केले आहे तसेच द्वितीय क्रमांक दीप्ती राऊत हिने ९०.६% गुण प्राप्त करून पटकावला तर अंकुर वायचोळ याने ८९.२% गुण प्राप्त करून तसेच पूर्वा घुंगरूड हिने ८८.४%, मधुरा बोके हिने ८८.२%, दिपाली ठाकरे हिने ८८%, आराध्य काकडे याने ८७.६% तर दिव्येश भगत याने ८७.२% गुण प्राप्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. दहावीच्या सि बी एस ई बोर्डाच्या परीक्षेत शाळेचा निकाल १००% लागला.
या सर्व यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आई वडिलांना, शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, इष्ट नातेवाईक, मित्र मंडळी यांना दिले आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या के साई नीरजा, पर्यवेक्षिका शबाना खान, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.