धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे शिक्षण संस्थेने 16 जून 1950 रोजी केवळ 46 विद्यार्थीनींसमवेत सूरु केलेल्या श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाला 75 वर्षे पूर्ण होत आहे . यानिमित्ताने धामणगाव शिक्षण संस्थेच्या वतीने या कन्या विद्यालयाचा अमृतमहोत्सवी सोहळा दि 26 डिसें ते 29 डिसें दरम्यान होत आहे . आज यानिमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संस्थेच्या विद्यानिकेतन सि बी एस सी स्कूल , तंत्रनिकेतन , आदर्श महाविदयालय , सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीमती हिराबाई गोयनका कन्या हायस्कूल यांनी सहभाग नोंदविला . या शोभायात्रेची सुरुवात श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विदयालयापासून सूरू झाली . शोभायात्रे मध्ये विविध देखावे, वृक्षदिंडी , पथनाट्ये सादर करण्यात आले .
शोभायात्रेचा समारोप शासकीय विश्रामगृह येथे पार पडला . समारोपीय कार्यक्रमामध्ये शोभायात्रेतील देखाव्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसक्रमांक जाहिर करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाला धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड . रमेशचंद्र चांडक ,उपाध्यक्ष अरविंद अग्रवाल , सचिव ॲड आशिष राठी , सहसचिव डॉ असित पसारी ,शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ शोभा राठी संचालक तथा कार्यकारीणी सदस्य प्रदिपकूमारजी लूनावत डॉ प्रकाश राठी , डॉ अशोक सकलेचा , चंद्रशेखर पसारी तसेच शाळा समिती सदस्य डॉ सारीका सकलेचा व ॲड राजेशजी चांडक यांची उपस्थिती होती . सोबतच संस्थेद्वारा संचालित सर्व शाळा, महविद्यालयाचे प्रमूख उपस्थित होते . संस्थेचे सहसचिव डॉ असितजी पसारी यांनी शोभायात्रेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भव्य शोभायात्रेच्या आयोजना बाबत श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाचे आभार मानले. याशिवाय या शोभायात्रेत सहभागी सर्व संस्था प्रमूख , शिक्षक शिक्षिका यांचे आभार मानले . उदया दिनांक 28/12/2024 रोजी अमृतमहोत्सवी उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली . या शोभायात्रेला धामणगाव रेल्वे शहरातील नागरीकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .
दिनांक- 26 डिसेंबर 2024