धामणगाव रेल्वे : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धामणगाव रेल्वे येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दतापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे दर्शन, तसेच वाराणसी येथील ९ भव्य देखावे हे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय सनई-चौघडा, ढोल-ताशा, लेझीम पथक यांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट व भव्य रोषणाई करण्यात येणार असून संपूर्ण परिसरात शिवजयंतीचा उत्साह निर्माण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, धामणगाव रेल्वे यांनी केले आहे.
















