पुलगाव
आर.के. परिवार, पुलगाव तर्फे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून भव्य नवरात्री गरबा उत्सव ‘जलसा’ मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम एकत्रितपणे सांस्कृतिक उत्साह साजरा करण्यासाठी आणि देवी माँ दुर्गाचा आशीर्वाद घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता. माँ दुर्गा देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून
कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर गणेश वंदना आणि माँ दुर्गा देवीची आरती झाली. सर्व विद्यार्थ्यांनी या नवरात्रोत्सवाचा एक भाग म्हणून “गरबा नृत्र्यामध्ये सहभाग घेतला. जवळपास सर्वच मुली गरबा नृत्याचे कपडे परिधान करून आल्याने वातावरण रंगतदार झाले होते. पंखिडा तू उड ना जाना पावागड रे पासून नवरात्रोत्सवातील सर्व गाण्यांवर मुला-मुलींनी गरबा नृत्य केले. या नृत्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले होते व गरब्याच्या तालावर फेर धरत नृत्य करून दिवसभर सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. आर.के. परिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाचे हे पहिलेच वर्ष आहे. आर. के. मिडल स्कुल, हायस्कूल, ज्युनियर कॉलेज व ज्ञान मंदिरम, शालेय व्यवस्थापन मंडळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.