विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्तापुर ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, धामणगाव रेल्वे.
विशेष आकर्षण – धामणगावमध्ये शिवजयंतीत अघोरी विद्येचा देखावा..
अमरावती ! सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.. यातच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम घेऊन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने भव्य राजांची मिरवणूक काढण्यात आली.. या मिरवणुकी दरम्यान मुख्य आकर्षण ठरलंय ते म्हणजे उत्तर प्रदेश येथील वाराणसी यांच्या 20 कलाकाराने सादर केलेली अघोरी विद्येचा देखावा.. थरारक असा देखावा या मिरवणुकीत पाहायला मिळाला.. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती..
लेडीज ढोल पथक (विद्यार्थी पथक बडनेरा), सैलानी ताशे (पुसद) , दिंडी, लेझिम पथक, बँजो , डिजे, घोडे, भजन मंडळी, तलवार बाजीचे खेळ, सांस्कृतिक देखावे व महाराजांची पालखी