धामणगाव रेल्वे :- शहरातील जे.बी. पार्क परिसरातील शिव नाग मंदिर येथे श्रद्धा व भक्तिभावाच्या वातावरणात भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला व महाप्रसादाचा आस्वाद घेतला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व सेवाभावी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात धार्मिक विधी, पूजन व महाप्रसाद वितरण शांततामय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये विशाल सर, गांधी बाबा ठाकूर, पवन लाहोटी, शुभम इंदानी, आशिष लाहोटी, नागरीकर सर, गुल्हाने सर, समीर केळोदे, कावरे सर, मुद्दे सर, चौधरी सर, डबले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाप्रसाद वितरणावेळी भक्तगणांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.













