शहरात क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य स्थानी असलेल्या प्रबोधन विद्यालयामध्ये पटना (बिहार) येथे होणाऱ्या 33व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर मुलींच्या सराव प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि 26/03/2024 ते 29/03/2024 दरम्यात करण्यात आले आहे… सदर शिबिरा मध्ये विदर्भातील नागपुर, भंडारा, वाशीम, अकोला, अमरावती सह अनेक जिल्ह्यातील खेळाडु आपली हजेरी लावतील.. होणाऱ्या सराव शिबिराच्या यशस्वीते करीता अमेच्युर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ व प्रबोधन परिवार तथा क्रीडा शिक्षक प्रयत्नशील आहेत…. प्रबोधन विद्यालयामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण शिबिराला अमेच्युर कबड्डी परिवाराचे जितुभाऊ ठाकुर (जनरल सेक्रेटरी ऑफ इंडिया), श्री अशोकराव देशमुख (सचीव, अमरावती जिल्हा), श्री सतीशजी डफळे (सह- सचिव अमरावती जिल्हा) यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या….
Home आपला विदर्भ प्रबोधन विद्यालय, दर्यापुर मध्ये 33 व्या राष्ट्रीय कबड्डी सराव प्रशिक्षण शिबिराचे भव्य...