आदर्श महाविद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न. 75 रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे :

स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे नुकतेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती तसेच धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व. लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या जन्मदिवस कृतार्थता दिन निमित्ताने दिनांक 12 जानेवारी ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद कुमार अग्रवाल, सचिव आशिष कुमार राठी, सहसचिव डॉ. असित कुमार पसारी, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप कुमार लुनावत, ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य प्रकाश राठी, रक्तदान समिती चे अध्यक्ष चेतन कोठारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एन. बायस्कर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन, प्रतिमांचे पूजन माल्यार्पण झाले.

रक्तदान शिबीर करिता अमरावती येथील प्रसिद्ध इर्विन शासकीय रुग्णालयाची रक्तपेढी अनुभवी डॉक्टर व स्टाफ सह आली होती. या रक्तदान शिबिरात एकूण 113 रक्तदाते यांनी नोंदणी केली असून 75 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले असून त्यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, धामणगाव परिसरातील महिला, नागरिक तरुण यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर रक्तदान शिबीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कर यांच्या मार्गदर्शनात यशस्वी रित्या पार पडले असून त्या करिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण केचे, डॉ. फुरकान पठाण, डॉ. पूनम गहुकार, डॉ.श्रीकांत पाटील तसेच राष्ट्रीय छात्र सेना चे अमोल बंड महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्स यांचे अथक परिश्रम लाभले.

स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने गेल्या 28 वर्षांपासून आदर्श महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून दरवर्षी धामणगाव परिसरातील रक्तदाते हे शिबीर यशस्वी करतात. रक्ताची आवश्यकता अशा सारख्या शिबिरातून काही अंशी तरी पुर्ण होत असते. आम्ही सेवा रुपी यज्ञात रक्तदान रुपी आहुती राष्ट्राला अर्पित करीत आहोत.धामणगाव वासियांचे आभार
– प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कर

veer nayak

Google Ad