चांदुर रेल्वे / एक हजार च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत चांदुरवाडी मध्ये मागील अनेक वर्षापासून गावातील ज्या ठिकाणावर संपूर्ण परिसर अंधारमय राहत होता, त्या परिसरात अखेर लाईट लावण्यात आले त्यामुळे चांदुरवाडी गाव हे अंधारातून प्रकाशाकडे झेप घेत असल्याचे दिसून आले, तर गावातील लोकांनी यावेळी आनंदोत्सव ही साजरा केला, मागील अनेक वर्षापासून गावातील अनेक भागात स्टेट लाईटची व्यवस्था नव्हती त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रात्री पाळीच्या वेळी अनेक समस्यांचे सामने करावे लागत होते,गावातील उपसरपंच सोनू शेख यांनी मागील अनेक वर्षापासून या परिसरात स्ट्रीट लाईट लावण्याची मागणीचा तागदा लावला, सरपंच सोनू शेख यांच्या प्रयत्नातून विजेचा खांब व त्यावरील चालू लाईट लागून प्रकाशमय वातावरण झाले ज्यातून संबंधित स्थळी राहणाऱ्या रहिवासींनी समाधान व्यक्त केले व यांचे आभार मानले तसेच गावातील इतर ठिकाणीही अशाच पद्धतीने ते विकासात्मक कामे करत राहणार असल्याचे सांगितले.















