ग्रामजयंती अर्थात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साह संपन्न.

0
71
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 श्री गुरुदेव संस्कार वर्ग जुना धामणगाव येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती अर्थात ग्राम जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेपाच वाजता संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी उठून संपूर्ण स्वच्छता करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले तर प्रमुख उपस्थितीमध्ये महेश धांदे ,अंकुश डुकरे , प्राचार्य मोहम्मद उज्जैनवाला, काजल मून ,प्रणिता शेंडे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ध्यानानंतर सामूहिक स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातामध्ये कराटे घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला .

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारलेली होती त्यामध्ये वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची भूमिका अंश माणूसमारे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका नक्ष मेंढे या विद्यार्थ्यांनी हुबेहूब साकारलेली होती हातामध्ये ग्रामगीता घेऊन ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा देशात समता नांदवा हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला संत गाडगे महाराजांच्या हातामध्ये खराटा घेऊन गाव स्वच्छ करा जेणेकरून संपूर्ण भारत स्वच्छ होईल हा संदेश यावेळी देण्यात आला. हातामध्ये भगव्या पताका घेऊन विद्यार्थ्यांनी ग्राम जयंती निमित्ताने स्वच्छता प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होतं. विविध भजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी या भारतात बंधुभाव नित्य वसु दे ,हर देश मे तू हर वेश मी तू तेरे नाम अनेक तू एक है , प्यारा हिंदुस्तान है गोपालो की शान है ,वीरो का मैदान इसमे भगवान है देशात समता नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा अशी भजनी गाऊन प्रभात फेरीमध्ये रंगत आणली छोट्या बालगोपालांनी यावेळेस ग्रामनाथाची भूमिका साकारली होती हातामध्ये भगवी पथक घेऊन हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केला त्याचे सुंदर दृश्य यावेळी विद्यार्थ्यांनी साकारले होते. ग्राम जयंती निमित्ताने ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस ग्राम जयंती म्हणून साजरा करतात जसे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालक दिवस म्हणून साजरा करतात डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून चांगला करतात त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांचा उद्देश हा मोठा असल्याने व्यापक असल्याने प्रत्येक गाव सुंदर स्वच्छ व आदर्श झाले पाहिजे त्याच वेळेस रामराज्य निर्माण होईल प्रत्येक गावां मधली व्यसनाधीनता बंद झाली पाहिजे. प्रत्येक गाव साक्षर झालं पाहिजे. आत्मनिर्भर झालं पाहिजे. व्यावसायिक झालं पाहिजे . जेणे करून भीक मागाची वेळ येणार नाही ..असा कटाक्ष व मोठा दृष्टिकोन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा होता आणि म्हणून माझा जन्मदिवस न करता आपण गावाचा जन्मदिवस करावा .जेणेकरून गाव सुंदर स्वच्छ आणि चांगले होईल हा आदर्श राष्ट्रसंतां कडून घेण्यासारखा आहे आणि म्हणून ग्राम जयंतीचे आयोजन संपूर्ण गावांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये होते. महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावची भंगता येईल अवदसा देशा म्हणून गावाला बकुळा येऊ नये यासाठी गाव सुंदर होणे गरजेचे आहे म्हणून महाराजांचा जो उद्देश होता तो आज प्रत्येक गावागावांमध्ये ग्राम जयंती मोठ्या उत्साहात चांगली जर झाली तर प्रत्येक गाव राम राज्य झाल्याशिवाय राहणार नाही . गाव आदर्श झालं की तरुण आदर्श होईल ,लहान मुलं आदर्श होईल ,गावातील स्त्रिया आदर्श होईल ,गावातील पुरुष आदर्श होईल ,आणि गावात कशाचाही भेद राहणार नाही जाती ,संप्रदाय राहणार नाही सर्व एकोप्याने राहतील . आणि मग ते गाव वैकुंठ होईल स्वर्गा सारखे होईल. म्हणून ग्राम जयंती प्रत्येक गावामध्ये होणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन हनुमंत ठाकरे यांनी. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ग्रंथ ग्रामगीता व इतर साहित्य भेट देण्यात आले कार्यक्रमाचा शेवट राष्ट्र वंदनेने करण्यात आला.

 

veer nayak

Google Ad