रोजगार सेवक नियुक्ती चा GR ग्रामपंचायत ने काढला म्हणत जळका (पटाचे ) ग्रामपंचायत च्या ग्रामसभेत गोंधळ.

0
138
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

जळका(पटाचे) ग्राम रोजगार सेवक पदावरून सुरु झालेले राजकारण. गटविकास अधिकारी यांनी शासन निर्णय दाखून केले शांत

आता फक्त ग्रामसभेतूनच रोजगार सेवक नियुक्त होणार. पात्र ग्राम रोजगार सेवक नियुक्ती चे सगळे अधिकार गावकऱ्यांनाच. शासन निर्णया नुसार किमान 10 वी पास च्या अटी मुळे झाला सगळा गोंधळ.

दि: 5-1-2026 ला ग्रा प जळका (पटाचे) रोजगार सेवक स्व प्रशांत शेलोकर यांचे प्रदीर्घ आजारणे मृत्यू झाल्या मुळे रोजगार सेवक पद रिक्त झाले. त्या मुळे साहनभूतीतून सरपंच पराग राऊत व गावकाऱ्यांनी तसेच आमदार प्रतापदादा यांनी त्या जागेवर स्व प्रशांत शेलोकर यांच्याच पत्नी श्रीमती भागेश्री प्रशांत शेलोकर यांनाच लावण्याचा प्रयत्न केला परंतु गट विकास अधिकारी यांनी नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2011/प्र. क्र. 40/रोहयो 10अ दिनांक 2 मे 2011 नुसारच कार्यवाही ग्रामपंचायत ने करावी,शासन निर्णया नुसार कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत वर कार्यवाही होईल असे कळविले व शासन निर्णया नुसार ग्राम रोजगार सेवक पदा करिता किमान 10 पास असणे आवशक आहे व श्रीमती भागेश्री प्रशांत शेलोकर या 10 वी पास नसल्यमुळे ग्रामपंचायत ला प्रश्न पडला.

तसेच ग्रामपंचायत विरोधी गटाला या गोष्टीत राजकारण करता येईल असे वाटले व त्यांनी गावकऱ्यांना सांगणे सुरु केले की 10 वी पास अशी कोणती अटच नसते व सरपंच नेमणूक करू शकते रोजगार सेवकांची अशा प्रकारे लोकांना भ्रमीत करुन भावनिक राजकारण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु केले व गावातीलसामाजिक वातावरण गढूळ केले.

दरम्यान सौ पिल्लारे यांनी चप्पल फेकली ती तिथे उपस्तित शेलोकर यांच्या नातेवाईकणा लागली व सदस्य पंधरे यांच्या पायाला लागली. तसेच गटविकास अधिकारी प. स. धामणगाव रेल्वे यांनी ग्रामपंचायत ने शासन निर्णया नुसारच ग्राम रोजगार सेवक पदाची नेमणूक करावी अशा आशयाचे पत्र सरपंच/सचिव यांना दिले आहे.

veer nayak

Google Ad