ग्रामपंचायत दाभाडा येथे अतिक्रमण कारवाई

0
80
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दाभाडा येथील ग्रामपंचायतच्या सरकारी जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण आज अधिकृतरीत्या हटविण्यात आले. तुळशीदास रुपराव भुसारी यांनी ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमण ग्रामपंचायत सरपंच मुकुंद माहुरे, ग्रामसेवक वाय. जी. भोगे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले.

कारवाईदरम्यान अतिक्रमणातील सर्व साहित्य जप्त करून ग्रामपंचायतच्या ताब्यात जमा करण्यात आले. ही कारवाई कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शांततेत पार पडली.

दरम्यान, गावकरी नागरिकांमध्ये चर्चेचा मुद्दा निर्माण झाला असून, इतर अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतने पुढील काळात उर्वरित अतिक्रमणांची तपासणी करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.

veer nayak

Google Ad