अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोज आवारे उपस्थित होत्या सर्वात प्रथम राजश्री शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले जसे रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, राखी स्पर्धा ,नृत्य स्पर्धा असे वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला व NCC विद्यार्थ्यांनी पथसंंचलन करून गावकऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मुख्याध्यापक अतुल बोरे सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सरोजा आवारे मेश्राम सर वाकेकर मॅडम चौधरी मॅडम ,आकरे मॅडम.