धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी
दिनांक – 8 जानेवारी 2025 रोजी अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार यांनी से.फ.ला. हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयास भेट दिली . त्यांच्या सोबत कु तेजश्री कोरे SDO चांदूर रेल्वे , धामणगाव रेल्वेचे तहसिलदार श्री अभय घोरपडे, गटशिक्षणाधिकारी कु सपना भोगावकर, विषयतज्ञ श्री धिरज जवळकार, श्री अरुण चव्हाण हे उपस्थित होते .
याप्रसंगी धामणगाव रेल्वे एज्युकेशन सोसायटीचे सचीव, से. फ. ला.शाळा समितीचे अध्यक्ष ॲड आशिष राठी यांनी जिल्हाधिकारी श्री सौरभ काटीयार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रदिप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी यांनी सुद्धा त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.. ॲड आशिष राठी यांनी धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे संस्था – संस्थापक, शिक्षणमहर्षी स्व.श्री श्रीनारायणजी अग्रवाल यांच्या बद्दल व धा. ए. सो. मार्फत चालणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती दिली तसेच धामणगाव एज्युकेशन सोसायटीला व से. फ. ला. विदयालयाला 110 वर्षे पूर्ण झाले आणि धामणगाव एज्युकेशन सोसायटीचा शताब्दी महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला हे आवर्जून सांगितले. तर से.फ.ला. विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी विद्यालयात चालणाऱ्या अनेक उपक्रमांची तसेच उत्कृष्ट निकालाच्या परंपरेची माहिती दिली . मा जिल्हाधिकारी यांनी विदयालयातील उपक्रमांची , निकालाच्या टक्केवारीची प्रशंसा केली . धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे नाव, उत्तम शिक्षण आणि शिस्तीसाठी घेतल्या जाते अशी प्रशंसाही केली . यावेळी प्राचार्य प्रशांत शेंडे यांनी मा जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले . यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते…